View Answer

उडत्या तबकड्या हा काय प्रकार आहे? वास्तविक परग्रहावरून त्या आलेल्या आहेत का? अशा यानातून पृथ्वीबाहेरचे जीव इकडे येतात का? यू.एफ.ओ. कुठून येतात?

What are UFOs and where do they come from? Have they travelled from other planets? Do aliens from other planets visit the earth in UFOs?

Physics Maharashtra

२४ जून १९४७ रोजी एका हौशी वैमानिकाला अमेरिकेतील माऊंट रेनियर जवळ उड्डाण करताना आकाशात तबकड्या दिसल्या. उडत्या तबकड्यांचे प्रसिद्धी मिळालेले हे पहिले उदाहरण असावे. त्या वैमानिकाचे नाव केनेथ अर्नोल्ड. त्याच्या पाठोपाठ इतर अनेकांनी अशा उडत्या वस्तू पाहिल्याचे दावे वेळोवेळी केले आहेत.

आकाशात उडताना दिसलेल्या अनोळख्या वस्तूला थोडक्यात ‘यू.एफ.ओ.’ (अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट किंवा अज्ञात उडणारी वस्तू) म्हणतात. अर्थात अनोळख्या वस्तूची ओळख पटली की तिची ही संज्ञा जाते. परंतु ती ओळख पटण्यापूर्वी एखादी यू.एफ.ओ. म्हणजे परकीय जीवसृष्टीतून आलेले अंतराळयान असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.

अर्नोल्ड प्रकरणानंतर अशा अनोळख्या उडत्या वस्तूंची आणखी प्रकरणे वृत्तपत्रांतून उजेडात आल्यावर त्यांच्या शास्त्रीय चाचण्या घेण्यात आल्या. प्रॉजेक्ट साइन, प्रॉजेक्ट ब्लू बुक इत्यादी नावाखाली अमेरिकेत चाचण्यांचे प्रकल्प राबवण्यात आले. काही प्रकरणांची वेगळी छाननी झाली. अशा तपासणीतून सर्वसाधरणपणे यू.एफ.ओ. म्हणजे काय असावे याची पुढील कारणे सापडतात:

1) क्षितिजाजवळ उगवताना किंवा अस्ताला जाणारा शुक्र हा कित्येकदा ‘अंतराळयान’ म्हणून भासलेला आहे.

2) वाळवंटातील मृगजळाप्रमाणे आकाशातही काही दृष्टिभ्रमाचे प्रकार यू.एफ.ओ. वाटतात. केनेथ अर्नोल्डचा अनुभव अशाच प्रकारचा असावा.

3) मानवानेच सोडलेले कृत्रिम उपग्रह किंवा अंतराळयाने यू.एफ.ओ. वाटतात.

4) यू.एफ.ओ. पाहिल्याचा दावा करणाऱ्यांची मानसिक तज्ज्ञांकडून तपासणी केली असता त्यांनी पूर्वीदेखील भास झाल्याची किंवा खोट्या गोष्टी रचल्याची कबुली दिली आहे.

5) फोटोरूपात यू.एफ.ओ.चा पुरावा पुष्कळदा बनावट स्वरूपाचा आढळला आहे. थोडक्यात, परग्रहावरून एखादे यान पृथ्वीवर येऊन गेले याचा एकही वैज्ञानिकदृष्ट्या भक्कम पुरावा यू.एफ.ओ.च्या हकिकतीतून मिळालेला नाही.

J. V. Narlikar

Author

Pranali Parab

Submitter

Do you think you can improve this answer? Learn how to submit a new answer