View Answer

तारे का लुकलुकतात? ग्रह का लुकलुकत नाहीत?

Why do stars twinkle? Why don't planets twinkle?

Physics Maharashtra

आपण तारे पाहतो किंवा दुर्बिणीतून त्याचे छायाचित्र घेतो ते त्यापासून येणाऱ्या प्रकाशकिरणांच्या मदतीने. तारे इतके दूर आहेत की त्यांचा आकार आपल्याला दिसत नाही. ते एक बिंदू मात्र दिसतात. ताऱ्यांपासून येणारी ही किरणे पृथ्वीभोवतालच्या वातावरणातील बदलत्या घनतेच्या, तापमानाच्या हवेच्या थरातून येतात त्या वेळी त्यांच्या दिशेत वक्रीभवनाने थोडा फरक पडतो. हे थर सतत बदलत असल्याने ताऱ्याचे बिंब थरथरताना दिसतात. तारे लांब असल्याने आणि प्रकाश मुळात त्यांच्याकडून येत असल्याने आपल्याला हा लुकलुकण्याचा परिणाम जाणवतो, म्हणजेच ते लुकलुकताना दिसतात.

ग्रह जवळ आहेत आणि दुर्बिणीतून पाहताना आपल्याला त्यांचा आकार दिसतो. खरे तर, वर सांगितलेल्या कारणांमुळे ग्रहाच्या प्रत्येक बिंदूवरून येणाऱ्या प्रकाशाची दिशा ही बदलत असते. ग्रह हे बिंदू मात्र न दिसत असल्याने गोळाबेरीज परिणाम असा होतो की ग्रह लुकलुकताना दिसत नाही. 

(ग्रह हे सूर्याच्या प्रकाशाच्या परावर्तनाने आणि विखुरण्याने प्रकाशतात. त्यांच्यापासून येणारा प्रकाश तेवढासा विखुरला जात नसल्याने ग्रहांच्या बाबतीत हा परिणाम जाणवत नाही.)

अरविंद परांजपे, नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई यांनी वरील उत्तर एप्रिल, २०२१ मध्ये अद्ययावत केले आहे.

J. V. Narlikar

Author

Pranali Parab

Submitter

Do you think you can improve this answer? Learn how to submit a new answer