View Answer

प्रकाशाचा वेग प्रथम कोणी व कसा मोजला?

Who first measured the speed of light? How?

Physics Maharashtra

१६७६ साली रोमर या शास्त्रज्ञाने गुरू ग्रहाच्या जवळच्या उपग्रहांना लागणाऱ्या ग्रहणांच्या वेळा नोंदून प्रकाशाचा वेग मोजला.जेव्हा गुरू उपग्रह आणि सूर्य यांच्या मध्ये असतो तेव्हा त्या उपग्रहाला ग्रहण लागते. हे उपग्रह गुरूभोवती बऱ्याच वेगाने फिरत असल्याने बरीच ग्रहणे पाहायला मिळतात. परंतु पृथ्वीवरून पाहताना आपल्याला बरीच ग्रहणे पाहायला मिळतात. मात्र पृथ्वीवरून पाहत असताना आपल्याला ती घडतात त्याच वेळी दिसत नाहीत, तर तेथून प्रकाश पोचायला लागलेला वेळ लक्षात घ्यावा लागतो. गुरू-पृथ्वी अंतर बदलत असल्याने हा वेळ बदलतो. याचे गणित मांडून रोमरने प्रकाशाचा वेग सेकंदाला ३.५ लाख किलोमीटर इतका ठरवला. आजचे उत्तर: २.९९७ लाख किमी. प्रतिसेकंद!

 

J. V. Narlikar

Author

Pranali Parab

Submitter

Do you think you can improve this answer? Learn how to submit a new answer