View Answer

लोखंडाचा ठोकळा पाण्यात बुडतो पण लोखंडाचे जहाज तरंगते ते का?

An iron block sinks in water, but why does an iron ship float on water?

Physics Maharashtra

यामागे ग्रीक शास्त्रज्ञ आर्किमिडीजचा शोध आहे. जर एखादी वस्तू तरंगायला हवी असेल तर तरंगण्याच्या स्थितीत तिने बाजूला सारलेल्या पाण्याचे वजन त्या वस्तूच्या वजनाइतके भरले पाहिजे. हा आर्किमिडीजचा सिद्धांत. जहाजातील लोखंड पत्र्याच्या स्वरूपात खूप पसरलेले असते. त्याने बाजूला सारलेले पाणी पुष्कळ असते व आर्किमिडीजचा सिद्धांत लागू पडण्याइतके असते. एक लोखंडी ठोकळा मात्र तसा बनवलेला नसतो आणि तो पाण्यात सहज बुडतो.

 

J. V. Narlikar

Author

Pranali Parab

Submitter

Do you think you can improve this answer? Learn how to submit a new answer