View Answer

किरणोत्सर्ग कशाला म्हणतात?

What is radioactivity?

Physics Maharashtra

एखाद्या मोठ्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन आणि प्रोटॉन या मूलकणांचा संचय असतो. परस्परांतील आकर्षणामुळे हे कण एकत्र असतात. पण काही अणुकेंद्रक आपला समतोल राखू शकत नाहीत व त्यातून फुटून काही कण बाहेर पडतात. त्याला ‘किरणोत्सर्ग’ म्हणतात.

बाहेर पडणारे कण तीन प्रकारचे असतात. त्यांचे रूप नीट कळण्यापूर्वी त्यांना अल्फा, बीटा व गामा किरणे म्हणत असत. त्यांपैकी अल्फा कण म्हणजे हेलियम अणूचे केंद्रक. त्यात दोन प्रोटॉन आणि दोन न्यूट्रॉन समाविष्ट असतात. बीटा कण म्हणजे ऋण विद्युतभार असलेले इलेक्ट्रॉन. हे वस्तुमानाने अल्फा कणांपेक्षा पुष्कळ कमी (सुमारे ७३०० वा हिस्सा) असतात. गामा किरणे म्हणजे प्रकाशाचे कण; फक्त हा प्रकाश दृश्य प्रकाशापेक्षा तरंगलांबीत पुष्कळच लहान पण तीव्रतेने पुष्कळच जास्त असतो. किरणोत्सर्गाचे प्रयोगशाळेत आणि नैसर्गिक परिस्थितीत अभ्यास करून शास्त्रज्ञांनी अणुकेंद्रकांच्या रचनेची खूप माहिती मिळवली आहे.

J. V. Narlikar

Author

Pranali Parab

Submitter

Do you think you can improve this answer? Learn how to submit a new answer