View Answer

विश्व प्रसरण पावत आहे म्हणजे नेमके काय? त्याचे प्रसरण कशात होत आहे?

What does it mean to say the universe is expanding? What is the universe expanding into?

Physics Maharashtra

आपला सूर्य आणि त्याची ग्रहमाला एका विशाल तारकाविश्वाचे सदस्य आहेत. त्या तारकाविश्वाला आपण आकाशगंगा म्हणतो आणि त्यात सूर्यासारखे १०० ते २०० अब्ज तारे आहेत.

आपल्या संपूर्ण विश्वात अशी असंख्य तारकाविश्वे आहेत, हे आता निरीक्षणातून दिसून आले आहे. अशा एखाद्या तारकाविश्वाचा वर्णपट पाहिला तर त्यांत काही काळ्या रेषा आढळतात. या शोषणरेषा म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांची तरंगलांबी (वेव्हलेंग्थ) प्रकाश शोषून घेणाऱ्या अणूंवरून ठरली जाते. परंतु बहुतेक तारकाविश्वांबाबत असे आढळते की या शोषण रेषांची तरंगलांबी ठरल्यापेक्षा जास्त आहे. त्या जास्त लांबीच्या लाल रंगाकडे सरकलेल्या दिसतात. ही तरंगलांबीची वाढ काय दर्शवते? भौतिक विज्ञानानुसार जर एखादा प्रकाशस्रोत आपल्यापासून लांब जात असेल तर त्याच्या वर्णपटातल्या रेषा लाल रंगाकडे सरकलेल्या दिसतात आणि हे सरकण्याचे प्रमाण दूर जाण्याच्या वेगानुसार वाढते.

१९२९ मध्ये एडविन हबलने अशा निरीक्षणातून एक नियम काढला: एखादे तारकाविश्व जितके लांब तितकाच त्याचा आपल्यापासून दूर जाण्याचा वेग जास्त! हबल नियमाप्रमाणे दूरची तारकाविश्वे जवळच्यापेक्षा जास्त वेगाने दूर जात आहेत. यालाच विश्वाचे प्रसरण म्हणतात. हे प्रसरण ज्या अवकाशात आहे तोच पसरतोय असे म्हटले तर अधिक संयुक्तिक ठरेल.

J. V. Narlikar

Author

Pranali Parab

Submitter

Do you think you can improve this answer? Learn how to submit a new answer