View Answer

विश्व मर्यादित आहे का अमर्याद? ते कसे ठरवायचे?

Is the universe finite or infinite? How do we find out?

Physics Maharashtra

आपल्या दुर्बिणी जेथवर पाहू शकतात तेथपर्यंत विश्व पसरलेले दिसते आणि तिथे आकाशगंगांचे समूह दिसतात. त्यामुळे विश्वाला मर्यादा असलीच तर ती अद्याप निरीक्षणाने दिसली नाही.

विश्वरचनेचे प्रचलित सिद्धांत मात्र असे गृहीत धरून चालतात की विश्वाला मर्यादा नाही. परंतु याचा अर्थ असा नव्हे की विश्वाचे घनफळ अनंत आहे. एखाद्या गोलाच्या पृष्ठभागाला मर्यादा किंवा सीमा नसतात. पण त्याचे क्षेत्रफळ मर्यादित असते. तसेच विश्वाच्या बाबतीत असू शकेल.

परंतु विश्वाचे घनफळ अनंत आहे का नाही हे ठरवायला खगोलविज्ञानाच्या सध्याच्या चाचण्या अपुऱ्या पडतात. एखादा ठराविक सिद्धांत खरा आहे का खोटा, हे ठरवायला विश्वाची लांबवरची निरीक्षणे, त्याची घनता, तापमान इत्यादी गोष्टी मोजणे आवश्यक आहे. अजून ही निरीक्षणे प्राथमिक अवस्थेत आहेत.

J. V. Narlikar

Author

Pranali Parab

Submitter

Do you think you can improve this answer? Learn how to submit a new answer