View Answer

श्वेतविवर म्हणजे काय? ते आकाशात कसे शोधावे?

What is a white hole? How can we find it in the sky?

Physics Maharashtra

समजा एखाद्या वस्तूचे सतत आकुंचन होत (पाहा प्रश्न कृष्णविवर किंवा ब्लॅक होल कशाला म्हणतात? विश्वात ब्लॅकहोल सापडले आहेत काय? सूर्य कृष्णविवर बनेल का?) तिचे कृष्णविवर बनत आहे. या घटनेची फिल्म घेऊन ती उलटी फिरवली तर काय दिसेल? एका लहानशा भागातून एका वस्तूचा बाहेर उद्रेक होताना दिसेल. श्वेतविवर म्हणजे असाच काही प्रकार असतो. 

श्वेतविवरात केंद्रातून मोठा उद्रेक होऊन प्रचंड प्रमाणात ऊर्जा आणि वस्तूचे मूलकण बाहेर पडतात. प्रथम त्यांचा वेग जवळजवळ प्रकाशाइतका असून पुढे त्यात घट होत जाते. पण प्रंचड ऊर्जेमुळे श्वेतविवर देदीप्यमान असते व लांबून दिसू शकते.

स्फोटातून प्रकाशासह ऊर्जा कण बाहेर पडताना दिसेल की तेथे श्वेतविवर असण्याची शक्यता असेल, असा एक दावा आहे. त्यानुसार तारकाविश्वांच्या केंद्र स्थानातून (काही निरीक्षणात) स्फोट होताना दिसतात, हे श्वेतविवरामुळे असे म्हटले जाते. पण या स्फोटांची वेगळी कारणेही असू शकतील. उदाहरणार्थ, तेथे कृष्णविवर असू शकेल.

J. V. Narlikar

Author

Pranali Parab

Submitter

Do you think you can improve this answer? Learn how to submit a new answer